जगभरातील देशांना कोरोना महामारीच्या विळख्यात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने कहर केला आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे.
शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे दोन हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये राजधानी बीजिंगमध्ये २० लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.
त्याच वेळी, रविवारी चीनमध्ये विक्रमी ३,३९३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच कोरोना संसर्गाची ३३०० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत
नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२० नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे.
चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचूनमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशात शहरातील ९० लाख लोकांना आपत्कालीन अलर्टनंतर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.