कॅनडामधील टोरांटो येथे झालेल्या भीषण कार अपघातामध्ये पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. एक व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलरची धडक झाली, त्यातच हे पाच भारतीय विद्यार्थी मरण पावले असं भारतीय दुतावासाने स्पष्ट केलंय. या अपघातामध्ये अन्य दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भारताचे कॅनडामधील राजदूत अजय बिसारीया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. “कॅनडामधील हृदयद्रावक घटना : शनिवारी टोरंटोजवळ झालेल्या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सद्भावना व्यक्त करतो. भारतीय अधिकारी मरण पावलेल्या व्यक्तींच्या मित्रांच्या संपर्कात असून त्यांना मदत करत आहेत,” असं अजय बिसारीयांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ट्विटरवरुन या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच भारतीय दुतावासाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य या मृतांच्या जवळच्या व्यक्तींना केलं जाईल असं म्हटलंय.
हर्षाली विनोद वांगे (११, रा. कुष्ठा) असे शेत तळ्यात पडलेल्या मुलीचे तर बाजीलाल कास्देकर (२५, कुष्ठा) असे मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचे नाव आहे. कुष्ठा गावालगतच हरिभाऊ नाथे यांचे शेत आहे. नाथे यांच्या शेतात शेततळे आहे. या शेत तळ्याजवळ हर्षाली दुपारी खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, सेल्फी घेत असताना पाय घसरुन हर्षाली शेत तळ्यात पडली. यावेळी नाथे यांच्या शेतातच काम करणारा युवक बाजीलाल कास्देकर याने हर्षालीच्या बचावासाठी शेत तळ्यात उडी घेतली.
मात्र बराच वेळ होऊनही हर्षाली किंवा बाजीलाल बाहेर आले नाही. हि माहिती गावकऱ्यांना मिळताच शेततळ्याजवळ गावकऱ्यांनी गर्दी झाली. या घटनेची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांना देण्यात आली. त्यामुळे पथ्रोट पोलिससुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आज सोमवारी नऊ वाजेपर्यंत दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
