मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) मुदत आज संपतेय. मुंबई महापालिकेवर उद्यापासून प्रशास नेमण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही आस्थानिक संस्थेला मुदतवाढ देता येत नाही. मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक घेणं शक्य होणार नाही.
आज मुंबई महापालिकेची मुदत संपत असून निवडणूक एप्रिल अखेर किंवा मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासन नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार उद्यापासून महापालिकेवर प्रशासक नेमला जाईल.
त्याआधी आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापौर म्हणून आपलं शेवटचं भाषण केलं. मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं आहे. आघाडी सरकार म्हणून काम करत आहेत त्यामुळे लोकांच्या आशिर्वादाने मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकणारच असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
