नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी दहा महिने प्रतीक्षा

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू ठरणारी माथेरानची मिनी ट्रेन सध्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावत आहे. नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनसाठी पर्यटकांना आणखी दहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. रुळ बदलण्यासह अन्य कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतली असून डिसेंबर २०२२ पासून नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळय़ानंतर नेरळ ते अमन लॉज मार्गावर २० किलोमीटरवर नवीन रुळांचे काम हाती घेण्यात आले. अपघात होऊ नये यासाठी रुळांच्या बाजूला उपाययोजनाही केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

शटल सेवांना वाढता प्रतिसाद सध्या अमन लॉज आणि माथेरान दरम्यान मिनी ट्रेनच्या आठवडय़ाच्या दिवशी एकूण १६ फेऱ्या, तर आठवडय़ाच्या शेवटी २० फेऱ्या होतात. जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ३ लाख १३ हजार ६६४ प्रवाशांची आणि ४४ हजार ७७९ पार्सल आणि अन्य वस्तूंची वाहतूक यातून करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेला १ कोटी ८९ लाख रुपये प्रवासी उत्पन्न मिळाले असून ३ लाख ५९ हजार पार्सलच्या वाहतुकीतून मध्य रेल्वेने कमाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *