अनेक वर्ष लोकांच्या कमाईचं साधन ठरतेय ‘ही’ नदी

झारखंडमध्ये वाहणारी स्वर्णरेखा (Swarna Rekha River in Jharkhand) नदीमध्ये पाण्यासोबत सोनं देखील वाहत आहे. म्हणून या नदीला स्वर्णरेखा नदी म्हणून ओळखलं जातं. झारखंडमध्ये एक जागा अशी आहे. जेथे स्थानिक आदिवाशी या नदीत सकाळी जातात. दिवसभर चाळणीच्या मदतीने सोने एकत्र कळतात. या कामात अनेक पिढ्या लागल्या आहेत. ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा जिल्ह्यातून वाहते. या नदीचा उगम झारखंडच्या रांची शहरापासून जवळपास १६ किमी दूर होतो. महत्वाचं म्हणजे ही नही मधल्या कोणत्याही प्रवाहाला भेटत नाही. ती सरळ बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.

येथे संशोधन केलेल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही नदी अनेक डोंगर रांगांमधून येते. यामुळेच या प्रवाहात सोन्याचे कण दिसतात. मात्र अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही.

नदीच्या प्रवाहातील रेती काढून सोनं एकत्र करणं हे काही सोपं काम नाही. आदिवासी कुटुंबातील लोकं दिवसभर पाण्यात उभं राहून सोन्याचे कण शोधतात. दिवसभर थांबल्यानंतर एका व्यक्तीला एक ते दोन कण सोनं सापडतं. त्याला विकून ८० ते १०० रुपये मिळतात. एक व्यक्ती महिन्याभरात ५ ते ८ हजार रुपये कमावतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *