पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंड आणि शिवजयंती असल्याने उर्से टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडलेले पाहायला मिळत आहे.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गर्दी झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले तसेच पुण्याला पोहोचण्यास उशीर होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे.
