वडिलांच्या मोबाइलवरुन एक्स-गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो Instagram ला होत होते शेअर; आरोपी सापडल्यानंतर पोलीसही चक्रावले

मुंबईत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने आपल्या नावे इन्स्टाग्रामला बनावट खातं तयार करण्यात आलं असून न्यूड फोटो शेअर केले जात असल्याची तक्रार ऑक्टोबर महिन्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी इन्स्टाग्रामशी संपर्क साधत तात्काळ हे खातं डिलीट करायला लावलं होतं. पण पोलिसांना आरोपीचा शोध लागला नव्हता. पण अखेर पोलिसांना आरोपी सापडला असून तेदेखील चक्रावले आहेत. कारण आरोपी १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे.

२१ वर्षीय तरुणीने गेल्यावर्षी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऑक्टोबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. आपल्या नावे इन्स्टाग्रामला बनावट अकाऊंट तयार करुन न्यूड फोटो शेअर करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली होती.

आरोपी ताब्यात

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून ती १६ वर्षांची मुलगी आहे. तक्रार करणाऱ्या मुलीच्या एक्स-बॉयफ्रेंडची ती प्रेयसी आहे. तरुणाचे ब्रेकअपनंतर या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. तिघेही एकाच परिसरात राहणारे आहेत.

द्वेषापोटी कृत्य –

यानंतर मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर पोलिसांनी आपल्याच प्रियकराच्या एक्स-गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या या १६ वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं आहे. फक्त द्वेषापोटी तिने हे कृत्य केलं होतं. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला अटक केली जाऊ शकत नाही. यामुळे तिला डोंगरीमधील बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *