घरातून सायकलने कामाला निघाला अन् वाटेत वाघाने झेप घेतली; चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कामगारावर वाघाचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. वाघाच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कामगाराचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाला आहे.

कोळसा वॅगन अनलोडिंग परिसरात जात असताना हा हल्ला झालाय. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील ‘कुणाल एंटरप्राइजेस’ या कंपनी मध्ये काम करणाऱ्या भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने मंगळवारी रात्री उचलून नेले होते. तो काम आटोपून सायकलवरून दुर्गापूर येथे घरी परतत होता. त्यावेळी वाघाने ‘कोल हँडलिंग प्लॅन्ट’ परिसरात त्याच्यावर हल्ला चढविला होता. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. कामगाराचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाला आहे.

दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत होता. काल रात्री पण या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. भोजराज यांची सायकल रस्त्यावर पडून होती. १३ नंबर गेट वरील घटना आहे. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. काही दिवसा पूर्वी वीज केंद्रातून एका पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेल्याची घटना घडली होती. या हल्ल्याने वीज केंद्रातील वन्यजीव वावराचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *