सुंदर पत्नी पतीसाठी ठरली मोठी अडचण, लग्नानंतर तीन दिवसात मोठा निर्णय

 लग्न करताना मुलगा, मुलगी एकमेकांचं रुप, शिक्षण इत्यादी गोष्टींचा विचार करून लग्नासाठी तयार होतात. आपला जोडीदार दिसायला सुंदर असावा अशी कित्येकांची इच्छा असते. पण काही ठिकाणी या सर्व गोष्टींचा विचार न करता लग्न होतात. पण त्यातून नशीबात येते ती म्हणजे फक्त निराशा…

असचं काही झालं आहे मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील मटोंध गावात राहणाऱ्यारीना आणि नंदू यांच्यासोबत… 30 एप्रिल रोजी रीना आणि नंदूचं मोठ्या थाटात लग्न झालं.  रीना दिसायला प्रचंड सुंदर आणि उच्च शिक्षित आहे.

लग्नानंतर रीना माहेरी गेली त्यानंतर सासरी कधी परतलीचं नाही. नंदू म्हणतो, ‘सुंदर पत्नी आता माझ्यासाठी शाप ठरली आहे…. लग्नानंतर ती माहेरी गेली त्यानंतर परत कधी परतलीचं नाही…’

नंदू पुढे म्हणतो, ‘मा जेव्हा तिला सासरी आणण्यासाठी गेलो. तेव्हा तिच्या घरच्यांनी मला मारहाण केली…’ याप्रकरणी नंदूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नंदूने लग्नाच्या दिवशी आपल्या परीने दागीने देखील दिले. नंदूची पत्नी सुंदर आणि शिकलेली आहे. त्यामुळे लग्नाला तीन 3 दिवस झाल्यानंतर रीना माहेरी गेली, ती परत येण्यासाठी तयार होत नसल्याचं नंदू सांगत आहे…

जेव्हा नंदूच्या सासरच्या मंडळींनी त्याला मारहाण केली, तेव्हा ती बाहेर देखील आली नाही.. यानंतर नंदू पाल लवकुशनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र तेथेही सुनावणी झाली नाही. आता नंदूने आता छतरपूरच्या एसपी कार्यालयात न्यायासाठी दाद मागितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *