सोलापूरात सापडली विकृत टोळी, बंदुकीच्या धाकावर विवस्त्र करुन अशी करत होते लूट

सोलापुरात गावठी पिस्तूलाचा तसंच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना नग्न करणाऱ्या आणि शेण खाऊ घालणाऱ्या विकृत टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवस्त्र करत असत, इतक्यावरच ते थांबत नसत तर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डही करायचे.

हे व्हिडिओ ते व्हॉट्सअॅपवर शेअर करत होते. लोकांना शेण खायला लावणं, हस्तमैथून करायला लावणं असे विकृत प्रकार ते लोकांना करायला लावत होते. या टोळीने विकृतीचा अक्षरश: कळस गाठला होता. अखेर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून हे सर्वजण 22 ते 26 वयोगटातले आहे. सागर कांबळे, बुद्धभूषण नागटिळक, सतीश गायकवाड आणि अक्षय थोरात अशी अटक करण्यात आलेल्या या विकृत नराधमांची नावं आहेत.

सोलापूरमधल्या जुना तुळजापूर नाका ते रुपभवानी मंदिर या परिसरात ही टोळी आपली विकृत कृत्ये करत होती. अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृताना अटक करून भा दं वि कलम 292, 506(2), भारतीय हत्यार कलम कायदा 3,4,25 तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 (अ) प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या चौघांकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल, धारधार शस्त्रं आणि 4 मोबाईल सह एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *