पुण्यात धक्कादायक घटना, तरुणावर टोळक्याकडून गोळीबार

संस्कृत पुण्यात धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबार करण्यात आला आहे. टोळक्याकडून दहशत परसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका तरुणावर टोळक्याकडून गोळीबार केला गेला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबवेवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री टोळक्याने दहशत निर्माण करत एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे तो थोडक्यात वाचला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गोळीबारप्रकरणी अमित थोपटे याने तक्रार दाखल केली आहे. आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटीसमोर तक्रारदार, त्याचा भाऊ आणि इतर मित्र रात्री गप्पा मारत उभे होते. त्यावेळी जुन्या भांडणावरून टोळक्याने गोळीबार केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *