बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे; पाहून पंतप्रधान मोदीही भारावले

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या या रविवारी अनंतात विलीन झाल्या. शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बापलेकीचं अनोखं नातं सर्वांनाच पहायला मिळालं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पाहून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारावले.

लतादीदींच्या अत्यंदर्शनासाठी शरद पवारांनी आपले बूट खालीच काढले होते. दर्शनानंतर पवार खाली उतरले. त्यावेळी पवारांना पुन्हा बूट घालण्यास त्रास होतोय हे खासदार सुप्रिया सुळेंनी हेरलं.

आपल्या वडिलांना त्रास होतोय. त्यांना मदतीची गरज आहे हे हेरल्यानंतर सुप्रिया सुळेंनी लगेचच आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार केला नाही आणि आपल्या वडिलांच्या पायात बूट घातले.

यावेळी समोरच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमे-यात कैद झालंय. या प्रसंगावरून बापलेकीचं नातं असं असावं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *