सख्ख्या बहिणीला घरात आसरा दिला पण घडलं असं काही की पोलिसही चक्रावले

औरंगाबादच्या सोयगावत तालुक्यातील गलवाडा येथे झालेल्या भरदिवसा घरफोडी प्रकरणातील आरोपीना शोधून काढण्यास पोलिसांना आठवडाभरानंतर यश आले आहे. मात्र यातील मुख्य आरोपीला पकडल्यावर पोलिसांना सुद्धा धक्काच बसला. कारण ज्या महिलेच्या घरात चोरी झाली होती त्याच महिलेच्या सख्या बहिणीने इतर साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव शहराच्या जवळच असलेल्या गलवाडा येथील सरलाबाई ईश्वर निकम यांच्या घरात २६ जानेवारी रोजी भरदिवसा चोरी झाली होती. ज्यात पाच लाख ३० हजार रुपये कॅश, २० हजार रुपयांचे सोने आणि १० हजार रुपयांची चांदी असा एकूण ०५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यानंतर सरलाबाई यांच्या तक्रारीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोडीनंतर पोलिस शहरातील सीसीटीव्ही तपासात असताना त्यांना एक दुचाकी संशयितरीत्या आढळून आली. तसेच याच संशयित आरोपीच्या फोनवरून एका महिलेच्या नंबरवर घरफोडीच्या दिवशी वारंवार फोन करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी विजय पाटीलला ताब्यात घेतलं आणि खाक्या दाखवताच त्याने घरफोडीची कबुली दिली. तसेच ही चोरी आपण नलिनी देठे यांच्यामदतीने व सांगण्यावरुन केल्याच सुद्धा त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता नलिनी ही फिर्यादी सरलाबाई यांची बहीण असल्याचं समोर आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *