आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीचा छळ

आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर मागासवर्गीय पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला स्मार्टफोनवर जातीवाचक अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पल्लवी सागर अवताडे (वय ३०, रा. डोणगाव ता. उत्तर सोलापूर) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलीस ठाण्यात पती सागर महादेव अवताडे (वय ३४) याच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. पल्लवी ही अनुसूचित जातीची असून तिचा आंतरजातीय प्रेमविवाह सागर अवताडे याजबरोबर १२ जून २०१८ रोजी झाला होता. परंतु हा आंतरजातीय प्रेमविवाह सागरच्या घरातील मंडळींना मान्य नव्हता. सासरी तिचा छळ होऊ लागला. नंतर सासरचे ऐकून पती सागर यानेही तिचा छळ सुरू केला. त्यामुळे वैतागून ती माहेरी आली होती. परंतु तिने पतीविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून तिच्यामागे पुन्हा लकडा लावण्यात आला होता. त्यातूनच पती सागर याने स्मार्टफोनवर पत्नी पल्लवी हिच्याशी संपर्क साधून तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि अवमानित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *