कल्याण पूर्वेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि भाऊ मुलीवर अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान मुलीला मारहाण झाल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडत असलेल्या या प्रसंगाचे कथन पोलिसांसमोर केले आणि दिलेल्या तक्रारीनुसार वडील आणि भावाविरोधात पोक्सो कायदा, विनयभंग आणि बलात्कार यांअतर्गत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे , असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.
दरम्यान, त्या मुलीने सुद्धा धाडस दाखवत पोलिसांना सर्व घटना सांगितली. यात तिने आपले वडील आणि भाऊ पाच-सहा महिन्यापासून त्रास देत आहेत आणि अत्याचार करत आहे असे सांगितले. तिने दिलेल्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी पोक्सो कायदा, विनयभंग आणि बलात्कार यां अतर्गत वडिल आणि भावाला शनिवारी अटक केली आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.
