गडहिंग्लज येथील गोड सहकारी साखर कारखान्याच्या बारा संचालकांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिले. कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण हे राजीनामे देत असल्याचे संचालकांनी म्हटले आहे.गडहिंग्लज येथील गोड सहकारी साखर कारखाना गेले दोन-तीन वर्षे वादग्रस्त आहे. ब्रिक्स कंपनीला हा कारखाना चालवण्यास दिला होता. दोन वर्षापूर्वी या कंपनीने तो परत संचालक मंडळाला दिला. गेले काही महिने कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने वाद वाढत गेला. कारखान्याचे अध्यक्ष शिंदे हे संचालकांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याने नाराजी वाढत गेली. या नाराजीतून १२ संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा साखर आयुक्तांच्या कडे दिला आहे. यामुळे या कारखान्यावर प्रशासक येण्याची शक्यता आहे. २० पैकी १२ संचालकांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा कारखाना राष्ट्रवादी आणि जनता दलाच्या ताब्यात आहे.
