कारागृहात पुन्हा ११ कैद्यांना करोनाची लागण; प्रशासनाची चिंता वाढली

जळगाव जिल्हा कारागृहात आणखी ११ कैद्यांना गुरुवारी करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. या सर्व बाधित रुग्णांना उपचारासाठी मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे कारागृहात करोनाबाधित झालेल्या एकूण कैद्यांची संख्या आता २४ झाली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहात १२ जानेवारी रोजी १३ कैद्यांना करोनाची लागण झाली होती. अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ११ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान, करोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये बुधवारीच अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *