५० वर्षीय मच्छिमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू; वर्षभरापूर्वी समुद्रातून केली होती अटक

गुजरातमधील एका ५० वर्षीय मच्छिमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. या मच्छिमाराला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एका वर्षापूर्वी समुद्रातून अटक केली होती. या मच्छिमाराच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं नसून अज्ञात कारणांमुळे त्याचा तुरुंगात मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. जयंती सोलंकी असे मृताचे नाव असून तो गीर-सोमनाथ जिल्ह्यातील सुत्रापाडा गावातील रहिवासी होता.

जयंतीचा काही आठवड्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु रविवारी स्थानिक अधिकार्‍यांना माहिती मिळाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. वेरावळ येथील गुजरात मत्स्यव्यवसाय विभागाचे एक पथक मच्छिमाराचा मृतदेह घेण्यासाठी पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवर पोहोचले आहे, असे मत्स्यव्यवसाय अधिकारी विशाल गोहेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *