आईने पाजले चिमुकल्याला विष

रामटेक पोलिसठाण्या अंतर्गत पंधरा किलोमीटर अंतरावरील बनपुरी येथे सासू सोबत झालेल्या वादातून  महिलेने आपल्या एक वर्षीय मुलाचा विष पाजून खून केला आहे. त्यानंतर महिलेने स्वतः विष प्राशन करून आत्महत्येच्या प्रयत्न केलाआहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वेदांत घावडे एक वर्षाचा मृतक चिमुकल्याचे नाव आहे. प्रणाली घावडे मृतक मुलाच्या आईचे नाव आहे.

सासुसोबत झालेला वाद गेला विकोपाला

पोलिसांच्या माहितीनुसार मुलाचे वडील रामकृष्ण घावडे हे शेती करतात त्यांचे लग्न तीन वर्षांपूर्वी प्रणाली सोबत झाले होते. शुक्रवारी दुपारी प्रणालीचा सासु सोबत वाद झाला. आणि तो वाद विकोपाला गेला होता. त्यातून सासूला प्रणालीने आत्महत्येची धमकी दिली होती. सायंकाळी वेदांत घरात खेळत असताना प्रणालीने त्याला उचलून जवळ घेतले. आणि त्याला विष पाजले होते थोड्या वेळातच स्वतः प्रणालीने विष प्राशन केले होते. हा प्रकार त्यांच्या नातेवाइकांच्या लक्षात येताच दोघांची प्रकृती खालावली असल्याने नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.  वेदांतला डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे.

या दरम्यान वेदांत ची आई प्रणाली चा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.या घटनेमुळे गावात एकुलत्या एक मुलाच्या आईनेच खून केल्याने खळबळ उडाली आहे. रामटेक पोलिसांनी प्रणाली विरुद्ध खुनाचा दाखल केला आहे.अद्याप मुलाच्या आईला अटक झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *