बिरजू महाराज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज भारतीय संगीताची लय थांबली आहे. सूर मौन झाले आहेत. भाव शून्य झाले आहेत. कथ्थकचे राजे पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे, अशी श्रद्धांजली मालिनी अवस्थी यांनी त्यांना वाहिली.
लखनऊच्या कथ्थक कुटुंबात जन्मलेल्या बिरजू महाराजांचे वडील आच्छान महाराज आणि काका शंभू महाराज यांचे नाव देशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये होते. त्यांचे मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी लवकरच त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी काकांकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली.
