बापरे एकाच ट्रॅकवर अचानक आल्या दोन मोनो ट्रेन, पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

एका ट्रॅकवर जर दोन ट्रेन समोर आल्या तर काय होईल? हा विचार करूनच अंगावर काटा येतो. मोनो रेल अर्धा रुळावर बंद पडली. त्यानंतर तिला स्थानकापर्यंत घेऊन जाण्यासाठी रेल्वेचा अजब जुगाड पाहायला मिळाला.

मिंट कॉलनी आणि एन एम जोशी मार्ग स्थानका दरम्यान मोनो रेल उभ्या राहिल्या होत्या. जवळपास 20 मिनिटं खोळंबा झाला होता. त्यानंतर या मोनो रेल सुरळीत सुरू झाल्या.

नेमकं काय घडलं? 

 मोनो रेल मध्येच बंद पडल्याने गोंळध उडाला. या मोनो रेलला स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेला दुसऱ्या मोनो रेलनं धक्का द्यावा लागला. निळ्या रंगाची मोनो रेल बंद पडली होती. मागच्या ट्रेननं पुढच्या ट्रेनला हळूहळू धक्का देऊन ती पुढच्या स्थानकापर्यंत पोहोचवली आहे.

मोनो रेल तांत्रिक बिघाड झाल्याने कदाचित बंद पडली असावी असा अंदाज आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. अत्यंत दुर्मीळ दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्याचा व्हिडीओ 24 तासकडे आला आहे.

जुगाड टेक्नोलॉजी मोनोनेही वापरल्याचं पाहायला मिळालं. मोनो स्थानकात पोहोचू शकल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. मात्र 20 मिनिटांसाठी तब्बल खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *