नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येतोय. सहा महिन्यात प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १ हजार १०३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच शनिवारी संध्याकाळी मिळालेल्या अहवालात स्पष्ट झाल आहे. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक जास्त मानला जातोय. आज रोजी (८/१/२०२२) जिल्ह्यात एकूण ३ हजार ५५० रुग्ण उपचार घेत आहे.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे नाशिक जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाशिक शहरात हे प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी दिसून येतेय.
शहरी आणि ग्रामीण भागात नवीन वर्ष्याच्या सुरवाती पासूनच कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत मोठा फरक दिसून येतोय. शहराची रुग्ण संख्या हि ग्रामीण पेक्षा चार पटीने वाढताना दिसून येत आहे. गेली चोवीस तासाच्या आकडेवारीत शहरी भागात ८५७ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत तर ग्रामीण भागात २०१ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.
