बहिण ११ वर्षांची असल्यापासून सख्खे भाऊच करत होते बलात्कार; आई, आजीला सांगितलं तरी…

दिंडोशी सत्र न्यायालयाने आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपी भावांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे आरोपी भाऊ २८ आणि ३१ वर्षांचे असून बहिण ११ वर्षांची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सहा वर्ष त्यांनी आपल्या बहिणीच्या शरिराचे लचके तोडले.

पीडित मुलीने १७ वर्षांची झाल्यानंतर पोलिसांत जाऊन भावांचा खऱा चेहरा उघड करण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी २२ वर्षांची झाल्यानंतर कोर्टासमोर दिलेल्या साक्षीत मुलीने आपण आपली आई, आजी आणि मामाला याबद्दल सांगितलं होतं अशी माहिती दिली. मात्र भावांना आपण तक्रार केल्याचं समजलं तेव्हा त्यांनी मारहाण करत छळ केला. मुलीचे वडील व्यसनाधीन असून बेरोजगार आहेत. तर मुलीची आई मोलकरणीचं काम करते.

सरकारी वकील सचिन जाधव यांनी कोर्टात पीडितेच्या आईने खटल्यात साक्ष दिली होती, परंतु फिर्यादीला पूर्ण पाठिंबा दिला नाही अशी माहिती दिली.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ११ वर्षांची असताना हा सगळा प्रकार सुरु झाला. तेव्हा आपण पाचवीत शिकत होतो. तिचा मोठा भाऊ तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. पण नेमकं काय सुरु आहे हे माहिती नसल्याने तिने कोणालाही याबद्दल सांगितलं नव्हतं. यानंतर त्याने तिला त्याच रात्री ड्रग्ज दिले आणि लैंगिक छळ केला. तीन महिन्यांनी त्याने पुन्हा तसंच केलं. यानंतर तिचा लहान भाऊदेखील यात सहभागी झाला.

आपण विरोध केला तर दोघेही छळ करत घाणेरड्या शब्दांमध्ये बोलायचे असं तिने सांगितलं आहे. मार्च २०१६ मध्ये तिने विरोध केला तेव्हा मोठ्या भावाने वासना पूर्ण कऱण्यास नकार दिल्याने तिच्या पोटात ठोसा मारला. यानंतर तिने पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *