कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गोवा राज्यातही शाळा बंद

कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. त्यानंत महाराष्ट्र राज्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 1 ते 8 वीपर्यंतच्या शाळा बंद  करण्यात आल्या आहेत. आता गोव्यातही (Goa) शाळा, महाविद्यालये बंद  ठेवण्यात आली आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारने 26 जानेवारीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत  सोमवारी कोरोना कृती दलाची बैठक घेतली.  त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. लस घेण्यासाठी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे.

कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गोवा सरकारने सोमवारी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टास्क फोर्सची बैठक झाली. तसेच किनारपट्टीच्या राज्यातही रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला. रविवारी, गोव्यात कोविड-19 पॉझिटिव्ह दर 10.7 टक्के नोंदवला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *