१५ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त

थर्टी फर्स्टसाठी मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात नागपुरात आणलेला १५ लाखांचा बनावट मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. वर्धा मार्गावरील सीताबर्डी व नवजीवन कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक केली आहे. अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण मोहतकर, सुभाष खरे, केशव चौधरी, दुय्यम निरीक्षक मोहन पाटील, मुकुंदा चिटमटवार, विनोद भोयर, विशाल कोहले, जवान राहुल पवार, शीतल सरोदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास उपअधीक्षक प्रशांत गोतमारे व मिरकले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *