लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात; कारचा चेंदामेंदा, 3 जागीच ठार

लातूर बार्शी राज्य महामार्गावर कार – कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघात तीन जण जागीच ठार झालेत. तर दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटनेरला भरधाव कारची जोरदार धडक बसली. कार लातूरकडे जात होती. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत. तर दोन जण जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात मृत पावलेल्या व्यक्ती लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावरुन अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *