पंढरपूर : रक्तदान करून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा यंदाही कायम

नवीन वर्षाचे स्वागत हे जल्लोष आणि फटाक्यांची आताषबाजी करून केले जाते. मात्र, पंढरपूरात मागील १८ वर्षांपासून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत रक्तदानाने होत आहे. या रक्तदान शिबीरामधे सुमारे १४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती आयोजक दादा फत्तेपूरकर यांनी दिली. एनआयटी कॉम्प्युटर, शाम गोगांव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्र परिवाराच्यावतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असते. अशातच मागील १८ वर्षांपासून येथील शाम गोगाव आदित्य फत्तेपुरकर मित्रमंडळ यांच्यावतीने रक्तादना शिबिराचे आयोजन केले जाते. करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असताना देखील शासनाचे कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून येथील जेठाभाई धर्मशाळेत शुक्रवारी रक्तदान शिबिर झाले. रक्तदना केल्यानंतर पुढील ४८ तास मद्यपान व मांसाहार करता येत नाही, असा वैद्यकीय सल्ला आहे. त्यामुळे थर्टीफस्ट रोजी व्यसनमुक्त तरूणाई रहावी. या निमित्त व्यसनमुक्तीची चळवळ सुरू रहावी. यासाठी हा प्रयत्न गोगाव व फत्तेपुर मित्र परिवाराकडून होतो.

या शिबिराचे उद्धाटन आमदार प्रशांत परिचारक, मनसेचे नेते दिली धोत्रे, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, निलरजा डोंबे, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, प्रणव परिचारक, नगरसेवक विवेक परदेशी, नवनाथ रानगट, सचिन कुलकर्णी, भास्कर कसगावडे आदींच्या हस्ते श्री विठ्ठालाचे पूजन करून करण्यात आले

याप्रसंगी शतकवीर रक्तदाते पत्रकार रवी लव्हेकर , रवींद्र भिंगे, शशिकांत दुनाखे तसेच मंदार केसकर, धनजंय मनमाडकर यांनी ५१ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सकाळी १० वाजता शिबिराला प्रारंभ झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहिले अशी माहिती शाम गोगाव यांनी दिली. या शिबिरासाठी सांगोला येथील रेव्हनील ब्लड बँकेने सहकार्य केले. तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महेंद्र जोशी, समीर देशमुख, सिद्धेश्वर कोरे , गणेश पिंपळनेरकर, दत्तात्रय पवार, विठ्ठल कदम ,बाहुबली गांधी, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *