भर थंडीत तुम्ही व्यायाम करीत असाल तर सावधान; प्राणायाम करताना महिला अचानक कोसळली अन्…

थंडीच्या दिवसांमध्ये सध्या प्रत्येक जण व्यायाम करण्याकडे लक्ष देत असतो. मात्र त्याचा अतिरेक केल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रत्येकानं सावधान राहणं महत्वाचं आहे.

नाशिकमध्ये प्राणायाम करताना असाच एका तीस वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. श्वास घेताना तिला त्रास होऊ लागला आणि श्वास अडकल्याने ती जागीच कोसळली.

नाशिकच्या मखमलाबाद परिसरात विद्या नगर मध्ये राहणारया या महिलेचे नाव सोनल आव्हाड असे आहे. नेहमी हसतमुख असणारया सोनलला आज प्राणायाम करता करता आपला जीव गमवावा लागला.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *