बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, विशाल निकम ठरला विजेता

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. यंदाच्या तिसऱ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आज बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. विशाल निकम हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

आज (२६ डिसेंबर) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. या सर्व स्पर्धकांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *