पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आदित्य यांना मेसेज करुन ही धमकी दिली आहे. दरम्यान, धमकी देणाऱ्याला मुंबई क्राईम ब्रॅन्चने ताब्यात घेतले आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे.

34 वर्षीय व्यक्तीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती.

आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. आरोपीने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजण्याच्या आदित्य यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. त्यांनी ते घेतले नाहीत. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याचा मेसेज आल्यानंतर रितसर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्याला अटक  केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *