संशोधन आणि विकास नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेतील सेंटियंट लॅबमध्ये(Sentient Labs) बुधवारी पुण्यात भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे उद्घाटन केले.
यावेळी प्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, लॅबचे अध्यक्ष रवी पंडित आदी उपस्थित होते. स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून हायड्रोजन इंधन (hydrogen fuel) घटाकडे पाहिले जात असून, जगभरात यावर संशोधन आणि प्रयोग चालू आहे. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात सहा चाकी ३२ आसनांची बस सादर करण्यात आली.
CSIR, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने केपीआयटीच्या Sentient Labsने हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानावर विकसित बसची निर्मिती केली.
”हायड्रोजन-संचालित तंत्रज्ञानावर भर देऊन शाश्वत पर्याय निर्माण करणे हे Sentient Labsचे ध्येय आहे. बॅटरी तंत्रज्ञान, इंधन सेल तंत्रज्ञान आणि हायड्रोजन निर्मितीसाठी तंत्रज्ञानातील येणाऱ्या अडथळ्यांचा आम्ही शोध घेतला आहे,” असे Sentient Labsने जारी केलेल्या प्रेसमध्ये म्हटले आहे.
