सन फार्मा औषध कंपनीला भीषण आग

अहमनगर एमआयडीसी येथील सन फार्म या औषध कंपनील बुधवारी रात्री अचानक आग लागली. आगीची तीव्रता खूप मोठी असल्याने यात कंपनीचे खूप मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.आग विजवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.

सन फार्मा या औषध कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहे.या प्रकल्प शेजारील रुम ला अचानक आग लागली.  आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटना स्थळी पोहचले आहेत.

आग लागली त्या ठिकाणी काही कामगार काम करत होते. आगीची तीव्रता खूप मोठी असल्याने भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. तसेच आग लागली त्या ठिकाणी रुग्ण वाहिका दाखल झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *