सरकारचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा, अन्यथा मेस्मा लावणार

एसटी संप कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार अखेर मेस्माचे (Mesma ) हत्यार उपसणार आहे. अद्याप कामावर न आलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने निर्वाणीचा इशारा देताना मेस्मा लावण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हा संप मिटणार की चिघळणार याकडे लक्ष लागले आहे.

आज दुपारी मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी अधिकाऱ्यांची बैठक होत असून या बैठकीत मेस्मा कायदा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची त्यांची मागणी कायम आहे.

सुमारे 9 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई करूनही संप मागे घेतला जात नसल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लावण्याची शक्यता आहे. मेस्मा कायद्यानुसार एसटी महामंडळाला संपकरी कर्मचाऱ्यांवर आणखी कडक कारवाई करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *