पुण्यातील या कंपनीचा ‘तालिबानी’ फतवा; वॉशरूमला जाण्यासाठी लेटर, मनसेचा दणका

आता एक धक्कादायक बातमी. महिला कामगारांना त्रास देणाऱ्या कंपनीत मनसेने जोरदार दणका दिला आहे. वॉशरूमला (washroom) जाण्यासाठी चक्क लेटर लिहून घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. हा कंपनीचा ‘तालिबानी’ फतवा  असल्याची चर्चा सुरु होताच मनसेने चांगलाच कंपनीला झटका दिला.

पुण्यातील या इंजिनिअरिंग कंपनीत महिलांना त्रास देण्यात येत होता. महिलांना गलिच्छ वागणूक मिळत होती. याबाबत तक्रार मनसेकडे आल्यानंतर मनसेने मॅनेजरला जाब विचारला. वॉशरूमला जाण्यासाठी महिला कर्मचाऱ्याकडून लेटर लिहून घेण्याचा प्रकार पुण्यात घडला होता.

या कंपनीच्या मॅनेजरला मनसे माथाडी कामगार अध्यक्ष नीलेश माझिरे यांनी जाब विचारला. मनसेने दणका दिल्यावर मॅनेजरने या गलिच्छ प्रकाराची कबुली दिली. पोंड पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारी कंपनीविरोधात तक्रार करणार आहेत. कंपन्यांमध्ये महिलांवर अन्याय झाल्यास मनसे स्टाईलने कंपन्यांनी उत्तर देणार असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *