साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; कार-ट्रक समोरासमोर धडकले आणि…

दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय २२), स्वयंम सुशिल खरात (वय १६) आणि अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटणहून दहिवडीला येत होते. त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता. दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला, तर कारला धडकलेला ट्रक उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात पियुष आणि स्वयंम हे दोघे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *