अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन, शाई फेकण्याचा प्रयत्न

 परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एसटी संपाबाबत तोडगा निघत नसल्याने जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे. अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्ती संघटनेनं आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी अनिल परबांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर आले आहेत. शाई फेकून न्याय मिळणार नाही. परबसाहेब चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. चर्चेतून तोडगा निघेल. काही जण कर्मचा-यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *