मनमाडहून आझाद मैदानाकडे निघालेल्या २१ एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज आणखी चिघळण्याची शक्यता आहेत. कारण २१ एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मनमाडहुन पंचवटी एक्सप्रेसने आंदोलक आजाद मैदानावर आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
अधिक माहितीनुसर, सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यभरात आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *