हल्ली देशभरातच काय तर प्रत्येक राज्यात गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. शुल्लक कारणांमुळे हत्या, आत्महत्या अशा घटना आपण रोजच पाहतो. असाच एक धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये समोर आला आहे. ही घटना अशी आहे की वाचून तुम्हालाही संताप येईल. राग अनावर झाल्याने काय होऊ शकतं याचं भयंकर उदाहरण म्हणजे ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फक्त वीस रुपये न दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने भाजीविक्रेत्याचा खून केल्याची खळबळजनक घटना बारामतीमध्ये घडली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी सध्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
