४५वर्षीय शेजाऱ्याने मुलीवर केले अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली घटना

ठार मारण्याची धमकी देऊन ४५वर्षीय इसमाने १५वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी इसमाविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मनीष मधुकर पराते असे अत्याचारी इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी नवव्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील खासगी काम करतात. मनीष एका कंपनीत चालक आहे. १२ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले. त्याच्या पत्नीला मूल नाही. मुलगी मनीषला ओळखते. जुलैत ती मनीषच्या घरी गेली. त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ठार मारण्याची धमकी देऊन तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. १६ नोव्हेंबरला मुलीची प्रकृती खालावली. आईने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरने सांगितले. तिच्या आईला धक्का बसला. आईने विचारणा केली असता मनीष अत्याचार करीत असल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यानंतर आईने मुलीसह कळमना पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मनीषला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *