मोठा घोटाळा उघड | शेतकऱ्यांची मोठी फसवणूक, मुख्य आरोपीविरोधात गुन्हा दाखल

 मराठवाड्यातील एक मोठा घोटाळा अशी चर्चा असणाऱ्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड याने ‘तीस-तीस’ योजनेत पैसे गुंतवण्यासाठी आमिष दाखवले. बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरवातील स्व:ताची मार्केटींग केल्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यापासून फरार आहे. त्यामुळे पैसे मिळण्याची अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलने बिडकीन पोलीस गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा घोटाळा कोट्यवधीचा आहे  विशेष म्हणजे यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी अडकले आहे. ज्या भागात सरकारी प्रकल्प राबवली जातात, त्या भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळात अडकवले. पोलीस आता राठोड याचा शोध घेत असून, तो सद्या फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.

‘तीस-तीस’ घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *