ठाण्यातील मंदिरात झालेल्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या आठवड्यात ठाण्यात मंदिरात चोरी झाली होती. या प्रकरणी चोरट्याला अटक केली आहे. मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळवली होती. नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर ते सुद्धा हैराण झाले.
मंदिरातील दानपेटी चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये चोरटा दानपेटी चोरण्याआधी देवाच्या पाया पडताना दिसत आहे. देवाच्या पाया पडल्यानंतर त्याने दानपेटी चोरल्याचे स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
