भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा, नवाब मलिक करणार भांडाफोड

राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा (BJP’s Former minister land scam) उघड करणार असल्याचे आज नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मलिक यांची आरोपांची मालिका सुरुच आहे. आता भाजपच्या माजी मंत्र्याच्या घोटाळ्याचा लवकरच पुराव्यांसह भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे .(Nawab Malik say BJP’s Former minister land scam )

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप करणारे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग पेडलर आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. दरम्यान, काल दुपारपासून मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे काम काहींनी सुरु केले आहे. मात्र, आम्ही याला घाबरत नाही. वक्फ बोर्डावर ईडीचा छापा. वातावरण बनवलं जात आहे, पण तसे होणार नाही. कोणाला तरी खुश करण्यासाठी हे सुरू आहे. उलट वक्फ बोर्डात आम्ही क्लीनअप ड्राइव्ह सुरू केला आहे. तो सुरुच राहणार आहे, असे मलिक म्हणाले.

जे देवस्थानाच्या नावाने मंदिर मस्जिदीच्या जागा लुटत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजपच्या एका नेत्याने शेकडो एकर जमीन देवस्थानाची लाटली आहे. त्याचा भांडाफोड आम्ही करणार आहोत. मागच्या सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याने मंदिराची जमीन लाटली आहे. त्यांचा भांडाफोड लवकरच करणार आहे, असे मलिक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *