ऑटोमध्ये ड्रायव्हर सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही: हायकोर्टाचा निर्णय

तीन जण बसू शकणाऱ्या ऑटोत सात-आठ जण कोंबून बसवल्याचं चित्र तुम्ही पाहिलंच असेल. एकट्या ड्रायव्हर सीटवरच दोन जण जास्तीचे बसवले जातात. ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसतं. मात्र केरळमध्ये आता ड्रायव्हर सीटवर प्रवाशाला बसवता येणार नाही. याचं कारण म्हणजे बसवल्यानंतर जर ऑटोचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये किंवा प्रवासी वाहनात वाहनाचा मालक अथवा प्रवाशाने चालकासोबत सीट शेअर करू नये, ही कृती विमा पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन आहे, असे मत केरळ हायकोर्टाने नोंदवले आहे.

“जर विम्याच्या दावेकर्‍याने वाहनाचा मालक म्हणून वाहनात प्रवास केला नसेल, तर त्याला विम्याच्या पॉलिसीमध्ये संरक्षण दिले जाणार नाही. याशिवाय तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये, ड्रायव्हरसीटवर त्याच्यासोबत इतर कोणीही बसू शकत नाही. प्रवासी किंवा वाहनाचा मालक या नात्याने इतर कोणत्याही व्यक्तीने ड्रायव्हरची सीट शेअर करू नये. असं करणारी कोणतीही कृती विमा धोरणाच्या अटींचे उल्लंघन आहे,” असं एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए. बादरुदीन यांनी म्हटलं. तसेच त्यांनी मोटार वाहन न्यायाधिकरणाने विमा कंपनीवर अशा निरुपयोगी प्रवाशाची भरपाई करण्यासाठी केलेली मागणी पूर्ण केली जाणार नसल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *