मुंबईत मोठी दुर्घटना! एक मजली घर कोसळून ९ जखमी

येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये एक मजली घर कोसळल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत सात जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं आसपासच्या रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे. ही घटना नेमकी कशामुळं घडली हे कळू शकलेलं नाही. अँटॉप हिल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *