कांदिवलीत इमारतीला आग, दोन जखमी

कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज भागातील गोल्ड शॉप इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी रात्री लागलेल्या आगीत दोनजण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.

या १५ मजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली.  मथुरादास मार्गावरील लिज्जत पापडच्या कार्यालयाजवळ ही इमारत आहे.  अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. या आगीत दोनजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *