उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे दीड कोटींचं घबाड

उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे दीड कोटींचं घबाड

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वर्धा जिल्ह्याचे अधिक्षक विजय कुल्लुर यांना अटक करण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून भंडारा लाच लुचपत विभागानं ही कारवाई केली आहे.

भंडाऱ्याचे अधिक्षक असताना विजय कुल्लुर यांनी एका बियर शॉपला परवानगी देली होती. त्याबदल्यात एक लाखाची लाच मागितल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर एसीबीनं त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरु केली होती. त्यानुसार कुल्लुर यांच्याकडे एक कोटी पंधरा लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणात लाचलुचपत विभागानकडून अखेर त्यांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *