अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडताच तालिबानचा गोळीबार आणि आतिशबाजीने जल्लोष

तालिबानच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला. ( Situation in Afghanistan) आता देशावर पूर्णपणे तालिबानची राज्यवट लागू झाली आहे. ( Afghanistan Updates) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी उड्डाण घेतल्यानंतर तालिबान दहशतवादी काबूल विमानतळावर शिरले आणि हवेत गोळीबार करून स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला. या दरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार फटाकेही उडवले. शेवटच्या उड्डाणासह, अमेरिकेची अफगाणिस्तानातील 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली.

अमेरिकेचे तालिबानसोबतच गेल्या 20 वर्षांपासूनचे युद्ध संपले आहे. अमेरिकन सेना 19 वर्ष, 10 महिने आणि 10 दिवसांनंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहे. बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानावर वर्चस्व मिळवणाऱ्या तालिबानने ‘स्वातंत्र्योत्सव’ साजरा केला आहे. शेवटचे अमेरिकन विमान काबूल विमानतळावरुन उड्डाण करताच बाहेर तालिबान दहशतवादी आत आले, असे ‘डेली मेल’ने म्हटले आहे. त्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि फटाके फोडले. अफगाणिस्तानचे आकाश रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघाले होते. मात्र, सामान्य अफगाणांची भीती वाढली आहे. कारण आता देश पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला आहे.

अमेरिकन लष्कराने काबूलमध्ये काही हेलिकॉप्टर आणि विमाने सोडली आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी या विमानांची तपासणी करताना दिसले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तालिबान अमेरिकन सैन्याने निघून गेल्याने आनंदाने वेडा झाला. ते गोळ्या झाडत विमानतळावर दाखल झाले आणि मुलांप्रमाणेच अमेरिकन लष्कराने सोडलेल्या विमानांवर बसलेल्या छायाचित्रांसाठी पोझ देत राहिले.

 तालिबानने विदेशी सैनिकांसाठी  31 ऑगस्ट या तारखेची मुदत निश्चित केली होती. ब्रिटनने रविवारी आपली बचाव मोहीम संपवली आणि अमेरिकेने सोमवारी अफगाणिस्तान देश सोडला. तथापि, अमेरिका आणि ब्रिटनला मदत करणारे शेकडो अफगाणी अजूनही अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. ब्रिटनने अशा सुमारे 1000 अफगाणांना सोडले आहे. या व्यतिरिक्त, सुमारे 200 अमेरिकन अजूनही अफगाणिस्तानमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *