काश्मीरी फुटीरतावादी नेते हा कोणी तिसरा पक्ष नव्हे असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीर मुद्दयाशिवाय भारताशी चर्चा निरर्थक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
काश्मीरी नेते हे काही तिसरा पक्ष नाही. या प्रकरणात तो महत्त्वाचा पक्ष आहे. त्यांच्या भविष्याचा निर्णय हा त्यांची मते विचारात घेतल्याशिवाय तसेच त्यांच्या संमतीशिवाय घेऊ शकत नसल्याचे शरीफ यांनी कॅबिनेट बैठकीदरम्यान सांगितले.
डॉनने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर मुद्दयाशिवाय भारताशी चर्चा निष्फळ असल्याचे शरीफ म्हणाले. भारत-पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा पाकिस्तानकडून रद्द झाल्यानंतर शरीफांनी हे विधान केले आहे.
२३ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अझिझ हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चेसाठी भारतात येणार होते. मात्र चर्चेच्या काही तासाआधी पाकिस्तानकडून ही चर्चा रद्द करण्यात आली.

