राज्यात पावसाळी आजारांचा धोका वाढला; डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाची रुग्णवाढ

एकीकडे कोरोनाचा धोका कमी होत असताना डेल्टा प्लसचा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत चार जणांचा डेल्टा प्लसने बळी गेला आहे. रायगडमध्ये दोघांचा तर रत्नागिरी, मुंबईत डेल्टा प्लसचा प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आता आणखी धोका वाढला आहे तो पावसाळी आजारांचा.  राज्यात डेंग्यू, चिकनगुनिया मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत.  मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, नागपूरमध्ये हा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबईकरांनी आवश्यक खबरदारी घेऊन तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेने केले आहे. नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत मुंबईत मलेरियाचे तब्बल 201, डेंग्यूचे 32, लेप्टोचे 15, गॅस्ट्रो 86, हिपेटायटिस 7 आणि ‘एच1एन1’चे 5 रुग्ण आढळलेत. पावसाळी आजारांमध्ये जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली, ही रुग्णवाढ कायम असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *