वसईतील हेफ्ट इंजिनिअरिंग या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. नेमुद्दीन मोहम्मद करीम सलमानी असे या कामगाराचे नाव आहे. या स्फोटामुळे लगतच्या भितींला भगदाड पडले आहे. या स्फोटात अन्य दोन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. हेफ्ट इंजिनीअरिंग कंपनी ही मुंबई अहमदाबाद महामार्गावर आहे. या कंपनीत उच्च दाबाने बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीच्या एका मोठ्या भिंतीला मोठे भगदाड पडले यावरून हा स्फोट किती शक्तीशाली होता याचा अंदाज येतो. या स्फोटानंतर भिंतीशेजारी काम करत असलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले.
स्फोट झालेल्या कंपनीच्या शेजारी डॉल्फिन नावाची कंपनी आहे. या कंपनीतील १८ वर्षीय कर्मचारी नेमुद्दीन मोहम्मद करीम सलमानी याचा मृत्यू झाला. तर, अनवर सिद्बिकी व विनोद यादव हे दोन कामगार जखमी झाले आहेत.
कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा